मनातलं दु:ख आपलं
तसं जुनंच असतं...
काळाच्या ओघात आपण
ते पचवलेलंही असतं....
सगळं सुरळीत चालू असताना
एखादी झुळूक क्षणासाठी येते,
मुरलेल्या त्या जुन्या क्षणांची
आठवण अस्वस्थ करून जाते.
फूटून रडावसं वाटतं... पण..
अश्रूंची भेटच होत नसते....
अश्रू संपले ? की दु:ख विरलं
ही संभ्रमावस्था टळत नसते.
आता दु:ख प्रखर राहिलेलं नाही ?
की सवय झालीय ? हे प्रश्न पडतात.
दाटून आलेल्या आभाळातले ढग
न बरसता फसवून जातात.
तहानलेला तो व्याकुळ जीव
शून्यात नजर लावून बसतो,
स्वत:च्याच कर्माला, नशिबाला
निष्कारण दोष देत बसतो.
कुणाची सहानभूती नको असते,
कुणाचं सांत्वन नको असतं...
फक्त थोडा वेळ हवा असतो
स्वतःचंच थोडं चिंतन हवं असतं.
त्या क्षणी क्षणभर का होईना
इतरांची सुखदु:ख परकी असतात....
आपल्या दुःखाच्या डोंगरावरून
इतरांचे डोंगर ठेंगणेच वाटतात.
मनात असतं... आवडलेलं
आपल्याला, आपल्यासाठी....
अन् हातात असतं... निवडलेलं
दैवानं आपल्यासाठी....!
आवडलेलं आणि निवडलेलं
यांची ताटातूट होत राहते...
म्हणूनच आपल्या प्रपंचात
सतत "तडजोड" होत राहते...
तसं जुनंच असतं...
काळाच्या ओघात आपण
ते पचवलेलंही असतं....
सगळं सुरळीत चालू असताना
एखादी झुळूक क्षणासाठी येते,
मुरलेल्या त्या जुन्या क्षणांची
आठवण अस्वस्थ करून जाते.
फूटून रडावसं वाटतं... पण..
अश्रूंची भेटच होत नसते....
अश्रू संपले ? की दु:ख विरलं
ही संभ्रमावस्था टळत नसते.
आता दु:ख प्रखर राहिलेलं नाही ?
की सवय झालीय ? हे प्रश्न पडतात.
दाटून आलेल्या आभाळातले ढग
न बरसता फसवून जातात.
तहानलेला तो व्याकुळ जीव
शून्यात नजर लावून बसतो,
स्वत:च्याच कर्माला, नशिबाला
निष्कारण दोष देत बसतो.
कुणाची सहानभूती नको असते,
कुणाचं सांत्वन नको असतं...
फक्त थोडा वेळ हवा असतो
स्वतःचंच थोडं चिंतन हवं असतं.
त्या क्षणी क्षणभर का होईना
इतरांची सुखदु:ख परकी असतात....
आपल्या दुःखाच्या डोंगरावरून
इतरांचे डोंगर ठेंगणेच वाटतात.
मनात असतं... आवडलेलं
आपल्याला, आपल्यासाठी....
अन् हातात असतं... निवडलेलं
दैवानं आपल्यासाठी....!
आवडलेलं आणि निवडलेलं
यांची ताटातूट होत राहते...
म्हणूनच आपल्या प्रपंचात
सतत "तडजोड" होत राहते...
No comments:
Post a Comment