Friday 17 August 2012

आठवणी जुन्या

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .....

college life

असं नेहमी आपल्याबरोबरच
का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच
college बोअर वाटतं

अचानक एक दिवस
तो गोड चेहरा वर्गात
येतो
आणि अख्खी college life
बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले
तरी वर्गात बसावेसे
वाटते
Result येत
नसला तरी practical
करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन्
तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार
पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले
तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण
college मध्ये
यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून
जातात
जाता जाता डोळ्यामध्ये
मात्र
विरहाची आसवे देऊन
जातात ....

जिवनाचे कोडे

माझे मन मला कधी कळलंच नाही
माझ्या भावनांना आकार देणे जमलंच नाही.
जिवनाचे कोडे सोडवणे जमलंच नाही.................

हृदयात होत ते ओठावरती आलंच नाही
ओठावरती आले ते हृदयात साठवता आलंच नाही.
जिवनाचे कोडे सोडवणे जमलंच नाही.................

अश्रुना डोळ्यात थांबवता आलंच नाही
पापण्यांचे दुख अश्रुना कळलंच नाही.
जिवनाचे कोडे सोडवणे जमलंच नाही.................

वेडावलेल्या मनाला कधी समजावता आलंच नाही
भरकटलेल्या पावलांना वाट भेटलीच नाही.
जिवनाचे कोडे सोडवणे जमलंच नाही................

कसं जिवन संपल ते कळलंच नाही
स्मशानात गेलो तरी जिवनाच कोडे सुटलच नाही.
जिवनाचे कोडे सोडवणे जमलंच नाही......

आयुष्याच्या ह्या वळणावर

आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं....
कोण असेल ती, कशी असेल ती,
... शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात....
मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर,
भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो ....
काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम .....
पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत.....
म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू
भी कभी अकेला मरता हे"

“प्रेम”

प्रेमात पडणं सोप्पं असतं
पण शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं....

प्रेमात वचनं देणं सोप्पं असतं

पण ती निभावनं कठीण असतं....

प्रेमात दिवस–रात्र एकमेकांशी बोलणं सोप्पं असतं
पण विरह सहन करणं अशक्य असतं....

प्रेम करणं सोप्पं असतं
पण प्रेम विसरणं शक्य नसतं....

प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात
पण शपथा देवून जीवाला बरं वाईट करून घेवू नकोस
असं म्हणायची वेळ येवून द्यायची नसते....

प्रेम जगण्यासाठी करायचं असतं
आणि प्रेमातच जगायचं असतं....
प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो....

प्रेम प्रेम असतं
दोन हृदयानचं अतूट नातं असतं....
एकमेकांना समजून घ्यायचं असतं
आणि एकमेकांबरोबरच जगायचं असतं....

प्रेम प्रेम असतं
प्रेमाचं विश्वच वेगळ असतं
आणि त्या विश्वात एकदातरी जगायचं असतं
पण प्रेम मात्र शेवटपर्यंत जपायचं असतं....!!

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

मनातले शब्द.....

मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने"हा मझा बॉय-फ्रेंड"असे इंट्रोड्युस"त्याला"केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्यापाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले.

Online मैत्री

असच “ Search” करता करता ........
तुला “Request” गेली ......
आज उद्या करता करता ........

तू “Add” झाली ......
तुझ्या विषयी बोलताना .........
खरच वेगळ “feel” होतंय ......
पण तुलाच ऐकायचं म्हणून .......
शब्द स्वताहून “Click” होतंय ......
तुझ्या डोळ्यांमध्ये लपली........
आहे आनंदाची डबी .......
ऐकल नाही तुला कधी .......
पण जाणवते मला गोड आवाजाची छबी .......
माझ्यासाठी सुंदर आहेस तू ......
हे सांगायचीच गरज नाही.........
बोलताना तुज्याशी माझा मीच रमून जातो.......
सतत राहव “Online “बाकी काहीच सुचत नाही .......
चेहरयावर तुज हास्य.......
माझ्यासाठी असाच राहो ......
या “वेगळ्या “ अश्या मित्रासाठी .....
हृदयात मात्र एक छोटीशी जागा ठेव ........

Thursday 16 August 2012

Jo Tera He Vo Mera He


मनातलं दु:ख

मनातलं दु:ख आपलं
तसं जुनंच असतं...
काळाच्या ओघात आपण
ते पचवलेलंही असतं....

सगळं सुरळीत चालू असताना
एखादी झुळूक क्षणासाठी येते,
मुरलेल्या त्या जुन्या क्षणांची
आठवण अस्वस्थ करून जाते.

फूटून रडावसं वाटतं... पण..
अश्रूंची भेटच होत नसते....
अश्रू संपले ? की दु:ख विरलं
ही संभ्रमावस्था टळत नसते.

आता दु:ख प्रखर राहिलेलं नाही ?
की सवय झालीय ? हे प्रश्न पडतात.
दाटून आलेल्या आभाळातले ढग
न बरसता फसवून जातात.

तहानलेला तो व्याकुळ जीव
शून्यात नजर लावून बसतो,
स्वत:च्याच कर्माला, नशिबाला
निष्कारण दोष देत बसतो.

कुणाची सहानभूती नको असते,
कुणाचं सांत्वन नको असतं...
फक्त थोडा वेळ हवा असतो
स्वतःचंच थोडं चिंतन हवं असतं.

त्या क्षणी क्षणभर का होईना
इतरांची सुखदु:ख परकी असतात....
आपल्या दुःखाच्या डोंगरावरून
इतरांचे डोंगर ठेंगणेच वाटतात.

मनात असतं... आवडलेलं
आपल्याला, आपल्यासाठी....
अन् हातात असतं... निवडलेलं
दैवानं आपल्यासाठी....!

आवडलेलं आणि निवडलेलं
यांची ताटातूट होत राहते...
म्हणूनच आपल्या प्रपंचात
सतत "तडजोड" होत राहते...

प्रेम कथा

हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन
त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..

तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’

पुढे..

या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.

"..पाहतो आणि कोसळतोच.."

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग’ झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं..

मुले .........असतातच असे

मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम
करणारे...

मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात
असणारे...

मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...

खरच काही मुले .........असतातच असे ....
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम
शोधणारे...

साथ हवा आहे मला

साथ हवा आहे मला

हाथ कधी ना सोडणारा

साथ हवी आहेत दोन पाऊले नेहमी सोबत चालणारी

जीवनाच्या वाटेवरून कधीही परत ना फिरणारी.

हवं आहे एक मन माझं मन समजणारं

कधी हलकेच रुसणारं कधी खुदकन हसणारं

हवं आहे एक हास्य मनाला वेड लावणारं

Monday 13 August 2012

मी उगाचच जगत होत

"आयुष्यात २ मनिटे सुद्धा कोणी माझ्या जवळ बसलं नव्हत,
 आज सगळे माझ्या जवळ बसले होते

कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते,
आज फुलांवर फुले मिळत होती

एक साधा रुमाल सुद्धा कधी कोणी मला दिला नव्हता,
आज पांढरी शुद्ध कापडे एकावर एक मला दिली जात होती

दोन पाउले कधी कोणी माझ्या बरोबर चालायला तयार नव्हते,
आज पूर्ण समाज माझ्या बरोबर चालत होता

आज मला कळाले कि मृत्यू किती सुंदर आहे ते,
आणि मी उगाचच जगत होत .

आयुष्भर साथ ♥♥♥

ती त्याला नेहमी ओरडते ...
"का रे तू अस करतोस ?
मी रोज खूप बोलते, अन तू नुसताच शांत असतोस ..
मी तुझी काळजी करते, अन तू हि माझी काळजी करतोस...
काहीही झालं मला, तर पूर्ण जग डोक्यावर घेतोस...


मी रोज तुझी वाट बघते, अन तू रोज उशिरा येतोस..
office असो, कि रात्री online,
तू नेहमीच का अस करतोस?....
का कळत नाही तुला माझ्या वागण्याचा अर्थ,
कि कळून हि न कळल्या सारखा करतोस?....

मनातल्या भावनांना माझ्या,
का समजून हि नसमजल्या सारखा करतोस?...
का करतोस रे अस तू ?
माझा असून हि का नाहीस रे माझा तू ?.... "

हे बोलून तिझे डोळे पाणावतात,
आणि तो तिझे डोळे पुसतो,
तिला पाहून हळूच हसतो...
अन तिला जवळ घेत घेत बोलतो..
"शब्दात सगळ कस सांगू ग तुला,
मनात आहे खूप काही...
वागण्यातून सांगतो जे ,
तुला ते कळत नाही...

चल शब्दात न सांगितलेलं,
आज मी तुला सांगतो,
मनातला गुपित माझ्या ,
आज तुझ्या पुढे मांडतो,

कळत नकळतच जुळल,
नात आपल्या प्रेम, आज मी हे मानतो..
अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी ...
घे आज मी हे तुला सांगतो...
घे आज मी हे तुला सांगतो... "

हे ऐकून ती स्तब्ध होते,
अन तो तिला मिठीत घेतो..
आयुष्भर साथ देण्याच वाचन,
आज तो तिला देतो.. ♥♥♥

पाउस नव्या उमेदीचा

पाउस................... नव्या उमेदीचा
तारुण्याच्या उंबर् ठया वर असताना
तू जरा जास्तच आवडतोस
तारुण्याच्या कश्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर
तू हवासा असतोस
तापलेल्या धर्तीवर बरसणाऱ्या
तुझ्या टपोर्या थेंबानी सर्व आसमंत दरवळतो
ढग दाटून येतात, वीज चमकते, काळोख होतो
सर सर बरसणाऱ्या तुझ्या सरीना अंगावर घेत
एक वेगळच गुंगून ओठ वर येतो
अचानक पाय थबकतात आणि मनाला लागून जाते
एकट भिजनायापेक्षा सोबत कुणीतरी हवस वाटते
वीज चमकतच अलगद जवळ घेणार
लटक्या रागाने आपण दूर व्हावं
आणि मेघ गरजताच घट्ट त्याला मिठी मारावी
इतक्या त्याच्या जवळ राहावं कि वाराही लाजेल
हळूच त्याचे शब्द कानावर पडावे
"पुन्हा अशी दूर नको जाउ स
आणि गेलीस तरी हा पाउसच आपल्याला
जवळ करील अगदी जन्मोजन्मी साठी"
आनंदाने मन वेडे व्हावे
आणि खरच मनाला लागून जाते
कुणीतरी अस असाव जीवनाला एक नवी उमेद देणार
तुझ्या सोबतीने बेफान होऊन पाय थिरकत राहावे
अंग अंग मोहरून जावे आणि अलगद ओठातून
तुझ्यासाठी शब्द फुटवे "पाउस हा असा एका नव्या उमेदीचा"

तुझ्या जागेवर दुसरे

तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमलं नाही
तुझ्या विरहात मला रडण्याशिवाय काहीच उरलं नाही

तरी म्हणतो जगावं
तु कधीतरी भेटशील
दुसरयाची का होईना एकदा तरी दिसशील

तुझे प्रेम तसेच असेल आजही मला वाटतं
मग कुठुन ढग येउन उरात पाऊस दाटतं

भेटल्यावर तु माझ्याशी
बोलशील तु खुप काही
जुन्या आठवणी जागवशील
कदाचीत हसशील आणि
खुप रडशीलही माझ्यासाठी

बंधनात अडकलो होतो दोघेही
त्यातुन मुक्त व्हायला कधी जमलेच नाही
नात्यांच्या वेलीमुळं मी मागेच राहीलो

तुझ्या लग्नातही हसुतही अश्रुच गाळत राहीलो
अश्रुंना आवरने कधीच जमले नाही

तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही ..

Sunday 12 August 2012

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु
का दुसर्याची झालीस?
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर
का माझ्या जीवनात आलीस?

चुक झाली माझी
चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम

केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु
मला का दिलेस?

नको ढाळुस अश्रु आत्ता
नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...
बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार
तुझ्या खोट्टया अश्रुंना...

आज रहाशील गप्पं
आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हामाझ्यावरचं
हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हामाझ्यावरचं
हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हामाझ्यावरचं
हसताना...
आफाट पसरलेल्या या जगात,
आपलं म्हणून कोणी असतं.

सुख दु:ख जाणायला,
हक्काचं माणूस असतं.

भरकटलेल्या पावलांना,
दिशा देणारं कोणी असतं.

निराश झालेल्या मनाला,

आधार देणार कोणी असतं.

आपल्यावरच्या त्याच्या
या प्रेमालाच "मैत्री" हे नाव असतं....
इतरांना सुगंध देण्याकरता
का फांदीपासुन तुटाव लागत ?
इतरांना प्रकाश देण्याकरता
का वातीला जळाव लागत ?

काळोखाची राञ एकटी
का चँद्राला जागाव लागत
इच्छा माझी पुर्ण कराया
त्या ताऱ्‍याला तुटाव लागत


याद कुणाची येता मजला
का आश्रुंना ओघळाव लागत
तहान माझी होन्यासाठी
रोज नदीला वहाव लागत

राञीमागुन दिवस उगवला
का सुर्याला तळपाव लागत
श्वास माझा होण्यासाठी
उगा हवेला पळाव लागत

जीवनाची जिंकन्या लढाई
क्षणा क्षणाला लढाया लागत
निसर्ग वेडा मला सांगतो
परोपकाराने जगाव लागत

मलमली तारुण्य माझे

मलमली तारुण्य माझे,
तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या,
तू जीवाला गुंतवावे..........

लागुनि थंडी गुलाबी,
शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन्
मी तुझ्यामाजी भिनावे....


कापर्‍या माझ्या तनूची
तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे,
पुन्हा तू पेटवावे......

रे तुला बाहुत माझ्या,
रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे,
तू मला बिलगून जावे…....

आज ती स्वप्नांत आली

आज ती स्वप्नांत आली

तशी ती रोजच येते

पण आज काही वेगळंच होतं

तोच चेहरा....जो हृदयाचा श्वास होऊन बसलाय

तेच डोळे...ज्यात पापणी न लवता मी पहायचो


तेच ओठ... ज्याची नेहमी आस असायची

ती म्हणाली,

किती दिवस झाले रे

येत नाही का तुला आठवण माझी


मान्य आहे, मी दूर आहे. पण तुला काय झालं, जवळ यायला?

तुझी खूप आठवण येते रे ...

मी म्हणालो,

दिवस सरले, पण मनांत अन् डोळ्यांत

तू तशीच आहेस सखे....माझीच


तुझ्या खूप जवळ आलोय ग पण तुला हे उमजेनाच

एक दिवस कळेल तुला सारे तूच तेव्हा म्हणशील

कसं सहन केलास रे हा दुरावा....

इतक्या जवळ असूनही तुझी खूप आठवण येते ग. ! :'(


क्षणांत ती अदृश्य झाली

दचकून जागा मी झालो डोळ्यांसमोर तोच चेहरा ...

तेच डोळे... अन् दुरावा... काही क्षण राहिलेला..!

Friday 10 August 2012

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

दिसते ती कशी माहिती नाही मला

पण वाटते आहे ती सुंदर, दिसायला ती मस्त,

माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,

पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,

एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,

आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

तुला पाहीलं की स्वतःला मी विसरुन जातो

तुला पाहीलं की स्वतःला मी विसरुन जातो

कुठल्या जगात हरवून जातो

जेव्हा तुझ्या डोळ्यात पहातो

बस एक ते हृदय तेवढे धडकते

सार्‍या जगाचा जणू विसर पडतो

... आणि स्वतःला मी विसरुन जातो




तुझ्याशी बोलायसाठी बरेचं काही ठरवतो

पण तुला पहाताचं निशब्द होवून जातो

रोज तुझ्या येण्याची वाट पहातो

नाही आली की चिडून जातो

आता नाहीचं बोलायचे तुझ्याशी ठरवतो

पण तु आली की मीचं आधी बोलतो

आणि स्वतःला मी विसरुन जातो




तुझ्या सोबत रडतानाही हसून जातो

तुझ्या सोबत मरतानाही जगून जातो

तुझ्या शब्दात रंग माझे शोधतो

तुझ्या श्वासात गीत माझे गातो

तु सोबतीला असली की

स्वतःला मी विसरुन जातो




माझा प्रत्येक क्षण तुझाचं असतो

कुठेही असलो तरी विचार तुझाचं असतो

प्रत्येक आभासात भास तुझाचं असतो

असणारा प्रत्येक आज तुझाचं असतो

घेतलेला प्रत्येक श्वास तुझाचं असतो


हे तुला सांगु म्हणून रोज ठरवतो


पण तुला पाहीलं की स्वतःला मी विसरुन जातो

Thursday 9 August 2012

एक एकटा एकटाच


मी एकटाच होतो अन् तोच बरा आहे

उमगले दोष माझ्याच रक्तात जरा आहे

मुखवटा घालुन हसरा फिरतो जरी जगी या

उघडा पडतो कधी कधी चेहरा जो खरा आहे

ठोकराच मिळाल्या दुनियेकडुन मजला

उठुन आताशा कुठे सावरलो जरा आहे

तुझ्या आठवांचा मनात दुखरा कोपरा आहे

मुक्त मनाचाही आता बंदिस्त पिंजरा आहे

कुणी कुणाचा नसतो या जगाच्या पाठीवर

कुणा न वाटे आपला मी तो उपरा आहे

Prem sandes प्रेम संदेश