Sunday 23 December 2012

दमलेल्या बाबांची कहाणी


कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुटलेले पाणी,
रोजचेच  आहे सारे काही आज नाही माफी  कशी मागू  पोरी मला तोंड नाही,
ज़ोपेतच घेतो तुला आज मी कुशीत निजतेच तरी पण येशील कुशीत,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
आट-पाट नगरात गर्दी होत भारी घामाघुम राजा करी लोकलची वारी,
रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेतच घरी,
स्वप्नातल्या गावा मधे मारू मग फेरी खर्या खुर्‍या  परि साठी गोष्टीतली परि ,
बांधींन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ओफीसात उशिरा असतो मी बसून भंडावले डोके गेले कामात बुडून ,
तास तास  जातो खाल माने ने निघून एक एक दिवा जातो हळूच विजून,
अशावेळी काय सांगू काय काय  वाटे आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे.
वाटते की उठुनिया तुज़या पास यावे तुज़या साठी पुन्हा लहान व्हावे
उगाचच  रूसावे नि भांडावे तुज्याशी  चिमुकले खेळ काही मांडावे तुज्याशी ———
उधळत खिधळत बोलशिल काही बघताना भान मला उरणार नाही ,
हासूनिया उगाचच ओरडेल काही दुरुनच आपल्याला बघणारी आई ,
तरी सुद्धा दोघे जन दंगा मांडू असा  क्षणा  क्षणा वर ठेवू खोडकर ठसा ,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं मऊ-मऊ  दूध भात भरवेल आई ,
गोष्ट ऐकायला मग यशील ना अशी सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी.
कुशी माज़ी सांगत आहे एक बाळा काही सदोदित जरी का मी तुझा पास नाही ,
जेउ माखु नाहू खाउ घालतो ना तुला आई परी वेणी - फनी करतो ना तुला ,
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुला तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा  रांगत रांगत घेतलास जेंव्हा  घराचा ताबा
लूटू लूटू  उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त  जवळच  पाहायच राहून गेल, राहील 
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून  हल्ली तुला  झोपेतच पाहतो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो  लवकर जातो आणि उशिराणी येतो,
बालपण गेले तुजे गुज निसटून उरे काही तुझा माझा ओन्झळी मधून ,
जरी येते ओठी  तूज्या माज्यासाठी हसे नजरेत तुज्या काही अनोळखी दिसे ,
तुज्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मधे बाबसाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला, 

Thursday 11 October 2012

सतत विचार

आपण सतत विचार करत असतो...
मनात आपण काय विचार करतो ?
आपण का विचार करतो ?
काय चाललय मनात ?
तुम्ही कधी एकलंय का ?
ऐकायला वेळ आहे का ?
अस होतं का ?
आणि होत असेल तर का होत ?
मन तर कशाने ना काशाने एकदम ठसाठस भरलेले.त्यात अनेक
गोष्टी ठासून ठुसून भरलेल्या असतात. त्यात ना काही जागा उरते ना
वेगळा विचार करायला वेळ मिळत. नेहमीचं कुठेतरी गुतंलेले असते
एक ना हजारो गोष्टी ....
सांध सोप सरळ जीवन कठीन करुन टाकायचं.......
चिंता करायची , तणावात रहायचं आणि ते कमी करायला
काहीतरी विरंगुळा म्हणून काही तरी शोधत फिरायचं
पण एक सांगा इतकं टेन्शन येतं कुठून ???
त्यामुळे मनावर आणखी वेगळे ओझे.......
अस टेन्शन घेवून जगायला खरचं आवडत का ?
फक्त टेन्शन घेवून जगायचं तर मग
जीवनात आनंदाला काहीचं महत्व नाही का ?
जर आहे तर मग आपल्याला आनंदी नाही होता येत का ?
आणि झालाचं तर मग तो आनंद काही काळचं का टिकतो ?
अस नाही होवू शकत का की आपण आपलं मन थोडं
रिकामं ठेवायचं .... आपले स्वप्न... आपल्या ईच्छा.....आपले ध्येय...
त्याच्यासाठीचे विचार आपल्याला आनंद देण्यार्‍या आठवणी ....
मनातला एक कप्पा ....मनातली ती जागा फक्त स्वतःसाठी रिझर्व....
करुन पहायला काय हरकत आहे ?

मैत्रीचे दिवस

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..नंतर उरतात
ती आठवणीची पिसे..काही मऊ,

काही खरखरीत..काही काळी,काही 

पांढरी..जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..

त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई..

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत राहण्यासाठी.

फक्त एकदाच

फक्त एकदाच्,एकदाच तू मागे वळून पाहशील?

मी तिथेच उभा आहे..

जिथे पूर्वी होतो,

आयुष्य माझं थांबलेल नाहीये तुझ्याविना..

 हे अगदी खरं.. पण त्यातले सूर मात्र हरवलेत..

ते गवसून देशील मला??

मी जसा आहे तसा स्वीकारशील मला?

तुझ्या मनात मला..

एका छोट्याश्या थेंबाएवढी जागा देशील?

पुन्हा एकदा मला सावरशील??

मला घेऊन ..

पंख देऊन ..

तुझ्या अवकाशात नेशील???..........♥♥♥

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

थोडक्यात, न विचारलेला विचार..

थोडक्यात, न विचारलेला विचार..
प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीशि अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहमी फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही तु दिसतेस!

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे 
काय असे त्यात जे लपले आहे

जो येतो तो अपुलेच गातो
नसे ठाव त्यासी माझ्या मनाचा

कोण आपुले कोण परके
कसे ओळखु सगळेच सारखे

टोचती एक खंत मना सदा
न जाणिले कोणी ते जाणिले माझ्या अश्रुंनी

ओघळले गालावरी सात्वंन कराया माझे
सांगुनी गेले अलगद मना
कोणी नाहि सोबत तरी आम्ही आहोत आजन्म तुझे.

जेव्हा वाटे एकटे कधी...बोलव तु निर्धास्त आम्हाला
नाही कधी म्हणणार नाही..येउ तुझ्या भेटिला..