Sunday 23 December 2012

दमलेल्या बाबांची कहाणी


कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुटलेले पाणी,
रोजचेच  आहे सारे काही आज नाही माफी  कशी मागू  पोरी मला तोंड नाही,
ज़ोपेतच घेतो तुला आज मी कुशीत निजतेच तरी पण येशील कुशीत,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
आट-पाट नगरात गर्दी होत भारी घामाघुम राजा करी लोकलची वारी,
रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेतच घरी,
स्वप्नातल्या गावा मधे मारू मग फेरी खर्या खुर्‍या  परि साठी गोष्टीतली परि ,
बांधींन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ओफीसात उशिरा असतो मी बसून भंडावले डोके गेले कामात बुडून ,
तास तास  जातो खाल माने ने निघून एक एक दिवा जातो हळूच विजून,
अशावेळी काय सांगू काय काय  वाटे आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे.
वाटते की उठुनिया तुज़या पास यावे तुज़या साठी पुन्हा लहान व्हावे
उगाचच  रूसावे नि भांडावे तुज्याशी  चिमुकले खेळ काही मांडावे तुज्याशी ———
उधळत खिधळत बोलशिल काही बघताना भान मला उरणार नाही ,
हासूनिया उगाचच ओरडेल काही दुरुनच आपल्याला बघणारी आई ,
तरी सुद्धा दोघे जन दंगा मांडू असा  क्षणा  क्षणा वर ठेवू खोडकर ठसा ,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं मऊ-मऊ  दूध भात भरवेल आई ,
गोष्ट ऐकायला मग यशील ना अशी सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी.
कुशी माज़ी सांगत आहे एक बाळा काही सदोदित जरी का मी तुझा पास नाही ,
जेउ माखु नाहू खाउ घालतो ना तुला आई परी वेणी - फनी करतो ना तुला ,
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुला तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा  रांगत रांगत घेतलास जेंव्हा  घराचा ताबा
लूटू लूटू  उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त  जवळच  पाहायच राहून गेल, राहील 
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून  हल्ली तुला  झोपेतच पाहतो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो  लवकर जातो आणि उशिराणी येतो,
बालपण गेले तुजे गुज निसटून उरे काही तुझा माझा ओन्झळी मधून ,
जरी येते ओठी  तूज्या माज्यासाठी हसे नजरेत तुज्या काही अनोळखी दिसे ,
तुज्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मधे बाबसाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला, 

Thursday 11 October 2012

सतत विचार

आपण सतत विचार करत असतो...
मनात आपण काय विचार करतो ?
आपण का विचार करतो ?
काय चाललय मनात ?
तुम्ही कधी एकलंय का ?
ऐकायला वेळ आहे का ?
अस होतं का ?
आणि होत असेल तर का होत ?
मन तर कशाने ना काशाने एकदम ठसाठस भरलेले.त्यात अनेक
गोष्टी ठासून ठुसून भरलेल्या असतात. त्यात ना काही जागा उरते ना
वेगळा विचार करायला वेळ मिळत. नेहमीचं कुठेतरी गुतंलेले असते
एक ना हजारो गोष्टी ....
सांध सोप सरळ जीवन कठीन करुन टाकायचं.......
चिंता करायची , तणावात रहायचं आणि ते कमी करायला
काहीतरी विरंगुळा म्हणून काही तरी शोधत फिरायचं
पण एक सांगा इतकं टेन्शन येतं कुठून ???
त्यामुळे मनावर आणखी वेगळे ओझे.......
अस टेन्शन घेवून जगायला खरचं आवडत का ?
फक्त टेन्शन घेवून जगायचं तर मग
जीवनात आनंदाला काहीचं महत्व नाही का ?
जर आहे तर मग आपल्याला आनंदी नाही होता येत का ?
आणि झालाचं तर मग तो आनंद काही काळचं का टिकतो ?
अस नाही होवू शकत का की आपण आपलं मन थोडं
रिकामं ठेवायचं .... आपले स्वप्न... आपल्या ईच्छा.....आपले ध्येय...
त्याच्यासाठीचे विचार आपल्याला आनंद देण्यार्‍या आठवणी ....
मनातला एक कप्पा ....मनातली ती जागा फक्त स्वतःसाठी रिझर्व....
करुन पहायला काय हरकत आहे ?

मैत्रीचे दिवस

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..नंतर उरतात
ती आठवणीची पिसे..काही मऊ,

काही खरखरीत..काही काळी,काही 

पांढरी..जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..

त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई..

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत राहण्यासाठी.

फक्त एकदाच

फक्त एकदाच्,एकदाच तू मागे वळून पाहशील?

मी तिथेच उभा आहे..

जिथे पूर्वी होतो,

आयुष्य माझं थांबलेल नाहीये तुझ्याविना..

 हे अगदी खरं.. पण त्यातले सूर मात्र हरवलेत..

ते गवसून देशील मला??

मी जसा आहे तसा स्वीकारशील मला?

तुझ्या मनात मला..

एका छोट्याश्या थेंबाएवढी जागा देशील?

पुन्हा एकदा मला सावरशील??

मला घेऊन ..

पंख देऊन ..

तुझ्या अवकाशात नेशील???..........♥♥♥

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

थोडक्यात, न विचारलेला विचार..

थोडक्यात, न विचारलेला विचार..
प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीशि अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहमी फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही तु दिसतेस!

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे 
काय असे त्यात जे लपले आहे

जो येतो तो अपुलेच गातो
नसे ठाव त्यासी माझ्या मनाचा

कोण आपुले कोण परके
कसे ओळखु सगळेच सारखे

टोचती एक खंत मना सदा
न जाणिले कोणी ते जाणिले माझ्या अश्रुंनी

ओघळले गालावरी सात्वंन कराया माझे
सांगुनी गेले अलगद मना
कोणी नाहि सोबत तरी आम्ही आहोत आजन्म तुझे.

जेव्हा वाटे एकटे कधी...बोलव तु निर्धास्त आम्हाला
नाही कधी म्हणणार नाही..येउ तुझ्या भेटिला..

"Cute प्रेमाचा Sweet गोलमाल"

"Cute प्रेमाचा Sweet गोलमाल" :-♥
जेव्हा तुम्ही प्रेम करता, .... 

तेव्हा तुम्ही दुखावले जाता
जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... 

तेव्हा तुम्ही द्वेष करता
जेव्हा तुम्ही द्वेष करता, .... 

तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, .... 

तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... 

तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता, 
पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥

तात्पर्य

मुली प्रेमात पडतात तेव्हा तिचे पालक विचारतात,
कोण आहे तो 'मुर्ख'...?
आणि मुले प्रेमात पडतात तेव्हा त्याचे पालक
विचारतात 'मुर्खा' कोण आहे ती मुलगी?

तात्पर्य : कोणीही प्रेमात पडले तरी मुलेच 'मुर्ख' ठरतात....

नातं

मृत्यू नंतरही टिकणार्‍या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

डोळे -३१ मिनिटे

मेंदू - १० मिनिटे

पाय - ४ तास

त्वचा - ५ दिवस

हाडे - ३० दिवस
आणि नातं ?

आयुष्यभर..................

नकळत

नातं जुळतं सहजपणे.

नातं टिकतं सहजपणे.

नातं तुटतं सहजपणे.

परंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे.

मग आठवणी का जात नाही सहजपणे.

कारण त्या कोरलेल्या असतात मनामध्ये नकळतपणे...

I love you meaning...........

English - I love you

Afrikaans - Ek het jou lief

Albanian - Te dua

Arabic - Ana behibak (to male)

Arabic - Ana behibek (to female)

Armenian - Yes kez sirumen

Bambara - M'bi fe

Bangla - Aamee tuma ke bhalo aashi

Belarusian - Ya tabe kahayu

Bisaya - Nahigugma ako kanimo

Bulgarian - Obicham te

Cambodian - Soro lahn nhee ah

Cantonese Chinese - Ngo oiy ney a

Catalan - T'estimo

Cheyenne - Ne mohotatse

Chichewa - Ndimakukonda

Corsican - Ti tengu caru (to male)

Creol - Mi aime jou

Croatian - Volim te

Czech - Miluji te

Danish - Jeg Elsker Dig

Dutch - Ik hou van jou

Esperanto - Mi amas vin

Estonian - Ma armastan sind

Ethiopian - Afgreki'

Faroese - Eg elski teg

Farsi - Doset daram

Filipino - Mahal kita

Finnish - Mina rakastan sinua

French - Je t'aime, Je t'adore

Gaelic - Ta gra agam ort

Georgian - Mikvarhar

German - Ich liebe dich

Greek - S'agapo

Gujarati - Hoo thunay prem karoo choo

Hiligaynon - Palangga ko ikaw

Hawaiian - Aloha wau ia oi

Hebrew - Ani ohev otah (to female)

Hebrew - Ani ohev et otha (to male)

Hiligaynon - Guina higugma ko ikaw

Hindi - Hum Tumhe Pyar Karte hae

Hmong - Kuv hlub koj

Hopi - Nu' umi unangwa'ta

Hungarian - Szeretlek

Icelandic - Eg elska tig

Ilonggo - Palangga ko ikaw

Indonesian - Saya cinta padamu

Inuit - Negligevapse

Irish - Taim i' ngra leat

Italian - Ti amo

Japanese - Aishiteru

Kannada - Naanu ninna preetisuttene

Kapampangan - Kaluguran daka

Kiswahili - Nakupenda

Konkani - Tu magel moga cho

Korean - Sarang Heyo

Latin - Te amo

Latvian - Es tevi miilu

Lebanese - Bahibak

Lithuanian - Tave myliu

Malay - Saya cintakan mu / Aku cinta padamu

Malayalam - Njan Ninne Premikunnu

Mandarin Chinese - Wo ai ni

Marathi - Me tula prem karto

Mohawk - Kanbhik

Moroccan - Ana moajaba bik

Nahuatl - Ni mits neki

Navaho - Ayor anosh'ni

Norwegian - Jeg Elsker Deg

Pandacan - Syota na kita!!

Pangasinan - Inaru Taka

Papiamento - Mi ta stimabo

Persian - Doo-set daaram

Pig Latin - Iay ovlay ouyay

Polish - Kocham Ciebie

Portuguese - Eu te amo

Romanian - Te iubesc

Russian - Ya tebya liubliu

Scot Gaelic - Tha gra'dh agam ort

Serbian - Volim te

Setswana - Ke a go rata

Sign Language - ,\,,/ (represents position of fingers when signing'I Love You')

Sindhi - Maa tokhe pyar kendo ahyan

Sioux - Techihhila

Slovak - Lu`bim ta

Slovenian - Ljubim te

Spanish - Te quiero / Te amo

Swahili - Ninapenda wewe

Swedish - Jag alskar dig

Swiss-German - Ich lieb Di

Tagalog - Mahal kita

Taiwanese - Wa ga ei li

Tahitian - Ua Here Vau Ia Oe

Tamil - Nan unnai kathalikaraen

Telugu - Nenu ninnu premistunnanu

Thai - Chan rak khun (to male)

Thai - Phom rak khun (to female)

Turkish - Seni Seviyorum

Ukrainian - Ya tebe kahayu

Urdu - mai aap say pyaar karta hoo

Vietnamese - Anh ye^u em (to female)

Vietnamese - Em ye^u anh (to male)

Welsh - 'Rwy'n dy garu

Yiddish - Ikh hob dikh

Yoruba - Mo ni fe

एकटेपणा..?

नेमका काय असतो हा एकटेपणा..?

जो एकट्याने येतो तो..की..

एकट करून जातो तो..?

'प्रेमा तुझा रंग कसा'

'प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! 

पण , तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच खाते.

'त्याला' किंवा 'तिला' वाईट वाटले तर... 'तो' किंवा 'ती' दुखावेल... अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे 'त्याने' किंवा 'तिने' म्हटल्यानुसार आपण वागत असतो. 'तो' किंवा 'ती' आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्‍या गोष्टीही आपल्यावर लादून 'हक्क' सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला 'नाही' म्हणता येत नाही. अर्थात 'नकार' देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्‍या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.

'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् 'ती' मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला 'तो' सांगतो, तसं करावंच लागतं....


महाविद्यालयीन जीवनात प्रेमाची उधळण करणार्‍या तरूण-तरूणीमध्ये 'न'ची बाराखडी त्यांच्याच होणार्‍या वादाचे कारण बनत असते. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून तरूण- तरूणी मन मारत एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे 'त्या' दोघांतील 'प्रेम' अधिक दृढ होण्याऐवजी गुंतागुंतच वाढत जात असते. त्यांना 'नाही' म्हणायची सवय नसते किंवा 'नाही' ऐकायचीही सयव नसते. त्यामुळे कमी वेळातच त्यांच्यातील नात्याला तडे पडतात व प्रेमाला कधी न सुटणारं 'ब्रेकअप'चं ग्रहण लागतं.

यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला 'नकार' देता येत नाही. प्रेमातच काय तर कुठल्याच नात्यामध्ये 'नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि 'नाही' म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. मन मारत आपण 'होकार' देत आपल्या मनातल्या मनात झुरत असतो. परंतु, आपल्या या भूमिकेमुळेच नको ते घडते. पाणी डोक्यावर गेल्यावर हात पाय हलवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग, एकदाचा वैतागून नकार दिला जातो नि गाडी कायमची रूळावरून खाली उतरते. प्रेमात पडतानाच 'नाही' म्हणणे शिकणे महत्त्वाचं आहे.

'प्रेम' जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.

प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे... थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा 'त्याला' किंवा 'तिला' नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. 'नाही' म्हटलं तर 'तो' किंवा 'ती' आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे 'तो' किंवा 'ती' मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे 'नाही' म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच 'नाही' म्हणणेच 'त्याच्या' किंवा 'तिच्या'साठी गरजेचे असते.

प्रेम... ... अधुरी एक कहाणी...

प्रेम... ... अधुरी एक कहाणी... एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली आपल्या Facebook माध्यमातून,,,,रोजच online बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही…. आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्............याला विचारले. तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम तुझ्यावर म त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर? अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय. लव. यु कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि Facebook वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले… वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास… ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…पुन्हा V.T. station वरून दिवसभराच्या भेटीची सांगता झाली….. दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला…..फक्त तिचे बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९ या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत…. दोघांनाही फार आठवण आली होती…सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून त्याने मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली….. सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ? अशी हि आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी...

प्रेमातला गोडवा

कसे सांगू तुला मी की तू माझा कोण आहेस
तू आयुष्यात असण्यानेच आयुष्याला माझ्या अर्थ आहे

तुझं अस्तित्त्व हेच आता माझं अस्तित्त्व झालंय
तुझ्या सुखदुःखातच माझं सुखदुःख सामावलंय

तुझ्या माझ्यात एक असं गोड नातं फुललंय
तुझ्याशिवाय जगणंही आता कठीण होऊ लागलंय

जीवनात कधी न यावा या नात्यामधे दुरावा
असाच राहो कायम हा प्रेमातला गोडवा !!!

आई, असं का ग केलंस?

आई, असं का ग केलंस? (मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)

उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ
पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच
्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून
दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा
अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती
आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन....
हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला
समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
असते! कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला. मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
आईला बघण्यासाठी मला अजून सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
काळजी वाटते, हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
जाऊन सुखरूप घरी येऊ दे."मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
जायचं आहे. राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
कानाशी म्हण.... झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.

एक सत्य माझ पण .........

एक सत्य माझ पण .........
आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत... 

आहे एक वेडी मुलगी

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
दिसते ती कशी माहिती नाही मला
पण वाटते आहे ती सुंदर, दिसायला ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

सांगांयच होत बरच काहि

सांगांयच होत बरच काहि,
सांगांयच होत बरच काहि,
धाडस मात्र झाल नाहि.
मनात लपलेल प्रेम माझ
ओठांवरति आलच नाहि

तुझ्या कडे पहाताना
दिवस संपला कळलाच नाहि
तु दुर जातना,थांबवयच
धाडस झालच नाहि.

दुस~याचि तु होतना,
शब्दच मला सुचले नाहि
अव्यक्त माझे प्रेमं मला
व्यक्तच करता आले नाहि........
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

... कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
तुला पाहीलं की स्वतःला मी विसरुन जातो
कुठल्या जगात हरवून जातो
जेव्हा तुझ्या डोळ्यात पहातो
बस एक ते हृदय तेवढे धडकते
सार्‍या जगाचा जणू विसर पडतो
... आणि स्वतःला मी विसरुन जातो

तुझ्याशी बोलायसाठी बरेचं काही ठरवतो
पण तुला पहाताचं निशब्द होवून जातो
रोज तुझ्या येण्याची वाट पहातो
नाही आली की चिडून जातो
आता नाहीचं बोलायचे तुझ्याशी ठरवतो
पण तु आली की मीचं आधी बोलतो
आणि स्वतःला मी विसरुन जातो

तुझ्या सोबत रडतानाही हसून जातो
तुझ्या सोबत मरतानाही जगून जातो
तुझ्या शब्दात रंग माझे शोधतो
तुझ्या श्वासात गीत माझे गातो
तु सोबतीला असली की
स्वतःला मी विसरुन जातो

माझा प्रत्येक क्षण तुझाचं असतो
कुठेही असलो तरी विचार तुझाचं असतो
प्रत्येक आभासात भास तुझाचं असतो
असणारा प्रत्येक आज तुझाचं असतो
घेतलेला प्रत्येक श्वास तुझाचं असतो
हे तुला सांगु म्हणून रोज ठरवतो
पण तुला पाहीलं की स्वतःला मी विसरुन जातो
प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,

"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये

आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,

ते एका कागदावर लिहु...."

प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...

मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात

तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3

पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,

का ??
.
.
कारण की,

त्याने त्याच्या कागदावर

फक्त एवढंच लिहीलेलं असत..

''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे''

ते पण जर तु होकार देणार असशील तर.. ♥

माणसावर जेवढ प्रेम
कराव तेवढीच माणसं
दूर जातात ?
फुलांना जास्त कवटाळल्यावर
पाकळ्याहि गळुन
पडतात
ज्याला मनापासुन
आपलं मानल तिच
आपल्याला विसरून
जातात
फुले गळु लागली की फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले तेच मिळत नाही बहूतेक आशेवर
जगणं यालाच
" खरं जगण " म्हणतात..

"माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो "तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा, "माझ्यासाठी" ♥♥♥
"माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो "तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा, "माझ्यासाठी" ♥♥♥
Love you my Sweetheart.....!!

तू समजुन का घेत नाही..........

कसं गं तुला काही समजत नाही !

साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,

भावना का माझ्या तुला जाणवत नाही !

साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,

तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,

कशातच लक्ष माझं लागत नाही !

एवढही तुला कसं कळत नाही,

तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,

तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !

माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,

पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,

मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !

आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,

त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,

हा काही आज उद्याचा खेळ नाही !

तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,

असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,

तू हे समजुन का घेत नाही......!!
मला GF हवी आहे साधी दिसणारी, काळ्या केसांची;
डोळ्यांची .......... .
जास्त प्रश्न न विचारणारी ,मराठीवर
प्रेम करणारी, उदार अंतः करणाची,
"बाहेरच खायला आवडत नाही मला" अस
बोलणारी, साधीच पण जीन्स घालणारी, पुस्तकांवर
प्रेम असणारी,
माझ्या काहीच्या काही कविता फालतू
असल्या तरी;
"....... खरचं किती सुंदर कविताआहेत
तुझ्या, जणू काही दुसरा मर्ढेकर" अस खोट खोट बोलणारी,
"हिंदी चित्रपट आवडत नाही मला ........
मराठीच आवडतात. पण तेही मी घरीच
बघते"
अस म्हणणारी, पावसात
भिजायला आवडणारी, "प्लीज मला काही गिफ्ट घेवू नकोस" अस
म्हणणारी,
आणि .......... ब्रेकअपच्या वेळी........
"प्लीज मला समजून घे, माझ्या पुढे
दुसरा पर्याय नाही"
हे इतक्या सच्चाईने बोलणारी, कि ते
एकूणच तिच्या पुन्हा प्रेमात पडावं अस
वाटायला लावणारी, एक GF हवीआहे,
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.........
हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे... ♥♥♥
खरे आहे ना?
मुलानो जाणून घ्या काही

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

... विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी

अपेक्षा व्यक्त करत
मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत

कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित

कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत

तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना

नात्यांच भान ठेवाव लागत

समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत

२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात

कधी वाटत मुलगी होण पाप का?

आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?

मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या? — —

मित्रानो जरूर शेयर करा
सर्वाना पर्यंत पोहोचू दे हि हाक
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत 
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
जेव्हा तुम्ही खरे बोलत असता तेव्हा 

ते सिध्द करायला कशाची गरज नसते 

कारण खोटे बोलतानाचं कारणांचा आधार घ्यावा लागतो 

गेलेल्या बद्दल कधीचं जास्त विचार करु नये ... 

कारण त्याने फक्त दुखः होते
येणार आहे त्याचा ही 

जास्त विचार करु नये.... कारण त्यामुळे चिंता होते
... ...

आहे तो क्षण आनंदाने घालवा......... कारण

त्याने खरे जीवन जगता येते

जीवनातला प्रत्येक अनुभव आयुष्याला

अधिक चांगले घडवतो
प्रत्येक येणारी

समस्या ही आपणाला रोखायचा प्रयत्न करते

हे आपल्यावर असते तिथेचं थांबायचे का मार्ग शोधून पुढे जायचे

नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा

जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही

पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात

जमलंचं तर विचार करा
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...

प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...

खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना.... ♥♥♥
कधी असही जगाव लागतं....खोट्या हास्याच्या पडद्या आड खरे दुःख लपवाव लागतं....कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवाव....इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवाव लागतं....खुप इच्छा असुन देखील नाही म्हणाव लागतं....खुप प्रेम असुन देखील नाही अस दाखवाव लागतं.... अस इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागतं....
कधी कधी असही जगाव लागतं.
खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ.

वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी,
तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.

तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा,
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे.

वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....! !!!
कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती,
... ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,
तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,
काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,
महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,
शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
‘तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,
एकून तिचे उत्तर, ‘मन’ बेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,
आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी..."
सुंदरते मुळे प्रेम नाही निर्माण होत
पण...प्रेमामुळे सारे काही सुंदर होते
मना जपण्यासाठी साठी सारे काही सोडा
पण काही मिळवण्यासाठी मन नका मोडू
जीवन काही झाड नाही 
त्यात नाही आवडत त्या वाईट आठवणीच्या फांद्या
तोडून कुठे दूर फेकता येईल ........
जीवन हे तर त्या गुलाबाच्या रोपासारखे आहे
गुलाबाच्या फुलासारख्या सुंदर आठवणी वर असतात
आणि त्या खाली सारे बोचणारे काटे लागलेले असतात..
आपल्या मनाचे नेहमी ऐका पण थोडे संयमाने
एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारा
" माझ्या वर माझा विश्वास आहे का ? "
मग तुमचा निर्णय कधीचं नाही चुकणार
जीवनाची व्याप्ती फार मोठी आहे ती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही
आणि प्रयत्न ही करु नये तसे करण्याचा
हर एक वेळी उत्तर शोधण्या पेक्षा सारे काही समजून घ्यावे
प्रत्येक क्षण अनुभवा त्याची मजा चाखा ....
मग तो कसा ही असो.........
त्येक क्षण जगावे ....भरभरुन जगावे ....
आनंदाने जगावे ...... असेचं काही किंवा काहीचं नाही
खूप काही किंवा बाकी सारे शून्य..............

काय वाटते ????
सगळ्यांन साठी मी आहे,

पण ?????

माझ्यासाठी कुणीचं
नाही..

सगळे मला सगळं काही सांगतात,

पण ?????

माझं ऐकणार असं कुणीचं नाही..

सगळ्यांच्या अडचणीत धावणारा मी,

पण ?????

माझ्या अडचणीत,
मला हात देणारा असं कुणीचं नाही..

मित्र म्हणून असणारे असे खूप आहेत,

पण ?????

मैत्री निभावणारा असं कुणीच नाही..

ती गेल्यावर..

रोज रडतो मी आता,

पण ?????

माझे डोळे पुसणार असं
कुणीचं नाही..

माझ्यासाठी ती, अजूनही माझं विश्व आहे,

पण ?????

तीच्यासाठी, आता मी कुणीचं नाही..

आता मी खूप एकटा आहे,

अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही..

अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही..
आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?

अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते

अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?

कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे

भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे

"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे

सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे

हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे

मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे

वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे

झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे

हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............

प्रतीक्षा

प्रतीक्षा आहे त्या दिवसाची ...

जेव्हा तुला माझ्या

प्रेमाचा अभिमान वाटेल ...

हृदयात तुझ्या मी असेल ..

आणि तुझ्या ओठावर नाव

फक्त माझेच असेल ...

चोर कप्पा

आज जरी तुला

माझी गरज नसली,

तरी माझा हृदयातील

चोर कप्पा तुझ्यासाठी

नेहमीच रिकामा असेल,

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते..............
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते............ ...
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते............... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणी कायेने सुंदर असते...........
कोणी मनाने सुंदर असते............
कोणी संस्काराने सुंदर असते...... ..... .
कोणी विचाराने सुंदर असते...........
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते...........
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते............
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाचे गाणे सुंदर असते............
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते............
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करू नका........
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा

Monday 8 October 2012

सर्व मित्र मैत्रीणीच स्वागत हे पेज तयार करण्या मागचे कारण कि आपल्या समाजात होत असलेली स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. फक्त गरज आहे तुमच्या प्रेमाची, सहकार्याची आणि प्रतिसादाची मग कराल ना मला मदत. तुमच्या लाईक आणि शेर्स शिवाय हे काम अशक्य आहे.
मित्रानो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया येथे पोस्ट करू शकता
www.facebook.com/pages/पाऊल-स्त्री-भ्रुणहत्ते-विरुद्ध/115228088631586

Sunday 7 October 2012

रडणाऱ्या डोळ्यांना

माझ्या रडणाऱ्या डोळ्यांना तुझ्या
प्रेमाची शप्पथ आहे..
तुझे प्रेम मला मिळणार नाही हे
माझ्या मनाला सुद्धा कळत आहे..
तरिही माझा आत्मा तुझ्या प्रेमासाठी रडत आहे..
हव्या असलेल्या सगळ्याच
गोष्टी माणसाला मिळत नसतात..पण..
न मिळण्याऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात......
♥ ♥ ♥ ♥ ♥♥ ♥ ♥ ♥ ♥

Thursday 4 October 2012

एकदाचं प्रेम केलं..
खुप काही सहन केलं आयुष्यात..
पण कधी रडावसं वाटलं नाही..
मनात होतं खुप काही..
पण कधी बोलावसं वाटलं नाही..
सर्वानी प्रेम दिलं मला..
पण कुणावर प्रेम करावसं वाटलं नाही..
प्रेम एकदाच केलं मी त्यात सुद्धा फ़सलो.. आणिपुन्हा कधी जगावासंच वाटलं नाही.

Wednesday 3 October 2012

प्रेम आणि लग्न ह्या दोन गोष्टींची सांगड घालणं आपल्याला एवढ का महत्वाच वाटत ? mhanje either pratyek veli prem asla mhanje lagna jhalach pahije hi aT kinwa lagna jhala aahe tar prem aslach pahije hi aT. he chukicha nahi vaatat ? mulat hya don goshtinchi levelach ek nahiye. eka goshtila atishay practical base aahe aani dusri gosht ha fakt ek manasik anubhav aahe.
lagna he thodyafar pramanat "soy" aahe asa mhantla tar mala nishchit manya aahe. kiman te julavtana tar tyat soy pahilich jaate...aani ti hi fakt tya don vyaktinchi navhe tar aju-bajuchya anek mansanchi (jyanna aapan family mhanto pan jyat itar anek samajik ghatak astat ase) suddha. mag pudhe sahavasane prem nirman hote ka fakt savayine sansar hoto he majhya mate tya tya vyaktivar avalambun aahe.
pan mulatach prem mhanje kaay ? majha kunavar tari prem aahe mhanje majha tya vyaktishi lagna vhava hi ichha yogya aahe pan haTT nakkich nasava. kinwa majha jari ekhadya vyaktivar prem asel tari tya badlyat tyachya kadun tasach response expect karnyat hi arth nahi. kunacha tari aaplyavar khup vishwas asava asa vaagna, tya vyaktishi changli maitri asna, tya vyaktila aaplya javal swatacha man mokla karta yena, tya vyaktila aapli bhiti na vaatna, kuthlyahi paristhitit aapala madaditacha haat pudhech asel ha vishwas tya vyaktila vaatna, tyachya dukkhat aapan kiman tya vyaktila sobat dena aani asha anek goshti mhanje prem asa mala vaatata. jithe "mala kaay milel" hyacha vichar na hota "mi kaay deu shakte / shakto" ha vichar asel te prem. je aai aaplya mulavar karte tasa. "mala he milala nahi, mala te milala nahi" he tya vyaktivar nahi swatavar prem karna aahe aani ti "soy" nahiye swarth aahe. mag he asa jar prem asel tar tya pudhchi payari mhanje lagna ashi demand kaa asavi ?
majhya mate aapan prem aani lagna hyat khup gallat karto mhanunach chukta. lagna hi soyach aahe mag te arrange marriage aso va love marriage aani he jar dhyanat ghetla tar kuthlach lagna far fasaychi aavashyakta nahiye khara tar.   

Tuesday 25 September 2012

खरं प्रेम म्हणजे

खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते 
जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात-
 मनाने, शरिराने! कायमचे..!! खरं प्रेम म्हणजे 
दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. 
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे. 
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे. 
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे. 
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे. 
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं. 
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे. 
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे. 
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. 
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं. 
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं. 
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे. 
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे. 
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे. 
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

Friday 21 September 2012

प्रपोज

कसं सांगू तुला ,
झालाय किती आतुर ,
तुझ्यासाठी हा जीव माझा
सुचत नाही दुसरं काही
तुझयाशिवाय मला,
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
चोहीकडे तूच आहेस ,
होतो असा भास मला
प्रत्येक चेहर्यात दिसतो ,
फक्त आणि फक्त तुझाच चेहरा
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
शब्दच फुटत नाही तोंडातून
पाहतो जेव्हा तुला
धडधडायला लागतं काळीज माझं,
बघताच समोर तुला
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
केलंस घायाळ तू ,
पहिल्याच नजरेत मला
वाटत होतं तेव्हा ,
तिथच करावं प्रपोज तुला
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
इवलसं काळीज हे ,
घाबरतं तुझ्या नकाराला
भावना माझ्या व्यक्त करण्यासाठी,
लिहिल्या या चार ओळी तुला
आवडल्या तर........आवडल् या तर ,
सांग ना माझी होशील का ?

Friday 14 September 2012

माझं प्रेम

"मी ही कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावर ही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी ही हरवून जायाचो,
कधी कधी तर वेळेचाही भान विसरून जायचो..
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूचं का होईना पण I Love You म्हणायचो..
नाहीचं Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ..
पण मी मात्र sMs-sMs खेळत राहायचो,
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं..
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
जाता जाता मला खूप वेदना दिल्या..
पण ?????
माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं..
जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत
धरतो तिचं अस्तित्वचं आपण Assume करतो..
समजत नाही कधी मोल नात्यांचं,
आणि मग दुःख करतो ते दुरावल्याचं..
आज खरचं समाधान वाटतंय,
की मी ही कधी प्रेम केलं होतं..
खरंच माझं प्रेम व्यर्थ नव्हतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ
घेऊन गेलं...."

आपण जिच्यावर प्रेम करतो,

आपण जिच्यावर प्रेम करतो,
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो..
डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो,
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो..
दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते,
कारण ती आपल्या हृदयात असते..
प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून
एकदातरी भेट होते,
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते..
दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर
येतो, स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो...♥

Sunday 2 September 2012

मी तुझी वाट पाहत राहील.......... ♥♥♥

गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिली ..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलीस..
आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत राहतो ..
जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील.......... ♥♥♥

का कळेना I Miss u ♥♥♥

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ? का कळेना. I Miss u

मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?


हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,

तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...??? का कळेना. I Miss u

लाख झाला असेल मनाचा दगड....,

तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??

जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??

या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..

पण..... तरीही जीव जडतातच ना .....?? ♥♥♥

का कळेना. I Miss u

अजूनही त्याच वाटेवर आहे

अजूनही त्याच वाटेवर आहे , जिथे तू मला सोडून गेली होतीस

अजूनही त्याच वाटेवर आहे , वाट तुझी पाहत आहे ........

कधी विचार सुद्धा केला नव्हता

कि तू मला सोडून जाशील...

पण या कलीयुगात मात्र उलटेच घडते .

आता आठवणी हृदयाशी जपून त्यातच पाहतो मी तुला ....

खात्री आहे मला नाही येणार तू परत

तरी ही वाट तुझीच पाहतोय ....

त्याच वाटेवर..........

त्याच वाटेवर....................

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी

माझ्यासाठी थांबलेली

माझ्या भेटीसाठी आसुसलेली...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी

माझे एकाकीपण संपवणारी

माझ्या सुखात सहभागी होणारी

माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

मला मी आहे तसेच स्वीकारणारी

मला समजून घेणारी

सावली सारखी सतत

माझ्याबरोबर राहणारी

माझ्या साठीच जगणारी'

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,.
पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.
खुप भाग्यवान असतात अशी मानसं,
ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं.....
प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,.
पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.
खुप भाग्यवान असतात अशी मानसं,
ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं.....

अचानक झालेले बदल

"तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने घेतलीय...

"काकी" ची जागा आता Aunt ने घेतली...य...

वडील जिवंतपणिचं "डैड" झाले,

अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??

भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis".........

दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर

रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....

दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...

घरची भाकरं आता कशी आवडणार हो...

५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झाली...

तुझी आठवण ........

तुझी आठवण

तुझ्याशी बोलून बर वाटत.

तुझ्या सहवासात खेळावस वाटत.

तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत.

तुझ्याशी विनाकारण भांडावसवास वाटत.

तू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस वाटत.

पण खरच तू दररोज आनंदी राहवअस मनाला वाटत.

नको जूस मला कधी सोडून

कारण तुला बगून अजून जगावस वाटत....

" I LOVE YOU "

प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,

प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी

त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........

असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ

जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर...

एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा

" I LOVE YOU "

कुणीतरी असलं पाहिजे…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना “लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर “back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर “सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस” असं बजावायला…
उशीर होत असेल, तर “जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही आपल्यासाठी जेवायचं थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून मन स्वच्छ करायला…

असेल कोणीतरी माझ्याचसाठी

♥..असेल कोणीतरी एखाद्या वळणावर

माझीही वाट पाहणारी

माझ्याचसाठी थांबलेली

माझ्या भेटीसाठी आसुसलेली..♥ ♥..

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी

माझं एकाकीपण संपवणारी

माझ्या सुखात सहभागी होणारी

माझं दु:ख आपले मानणारी

मला समजुन घेणारी....♥ ♥..

सावली सारखी सतत माझ्याबरोबर राहणारी

केवळ माझ्याचसाठी जगणारी

आणि माझ्याचसाठी मरणारी...♥ ♥..

असेलही कदाचित...! ♥

आज परत तुझी आठवण आली

आज परत तुझी आठवण आली
अचानक मी एकटाच हसलो
मनात झाली गर्दी विचारांची
त्यात मी स्वतःला हरवुन बसलो

वेळ जतांना पुढे
स्मृतींची घड्याळ मागे फिरली
जावून थांबली त्या ठिकाणी
जिथे तू पहिल्यांदा भेटली

तुझ हसण, तुझ रूसण
कधी ओठांनी, कधी डोळ्यांनी बोलण
आठवत मला आजही ते
नजर चोरून तुला बघण

आज तुझी आठवण दरड बनुण कोसळलि
तिला अडवुही शकलो नाही, मी पळू ही शकलो नाही
छातीत गुदमरत गेला प्रतेक श्वास
मी जागूही शकलो नाही, मी मरुही शकलो नाही

तुझया आठवणींना देत उजाळा
आज ही रात्र जागली आहे
तुझयाच स्मृतीचा गंध .उण
ही रातराणी फुलली आहे

डोळयात आले बनुण पाणी
आज तुझे स्मरण आहे
सहज वाहून जातील कसे
पापण्यांचे मी केले धरण आहे

आठवणींची अशी शीदोरी
सरता न सरणारी
पुरूनही उरणारी
आशा तुझ्या आठवणी.....