Friday 21 September 2012

प्रपोज

कसं सांगू तुला ,
झालाय किती आतुर ,
तुझ्यासाठी हा जीव माझा
सुचत नाही दुसरं काही
तुझयाशिवाय मला,
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
चोहीकडे तूच आहेस ,
होतो असा भास मला
प्रत्येक चेहर्यात दिसतो ,
फक्त आणि फक्त तुझाच चेहरा
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
शब्दच फुटत नाही तोंडातून
पाहतो जेव्हा तुला
धडधडायला लागतं काळीज माझं,
बघताच समोर तुला
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
केलंस घायाळ तू ,
पहिल्याच नजरेत मला
वाटत होतं तेव्हा ,
तिथच करावं प्रपोज तुला
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
इवलसं काळीज हे ,
घाबरतं तुझ्या नकाराला
भावना माझ्या व्यक्त करण्यासाठी,
लिहिल्या या चार ओळी तुला
आवडल्या तर........आवडल् या तर ,
सांग ना माझी होशील का ?

No comments:

Post a Comment