नाते तुझे-माझे
स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस ...
गप्प राहा ग आता किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना माझ्यावर का तू रुसतेस?
दिसलो नाही एकदा जरी अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना मैत्री मात्र विसरतेस ...!!!
माझ्याविना तू , तुझ्याविना मी कधी ना राहू शकलो तरीही
या गोंडस नात्याला प्रेम नाही म्हणू शकलो ??? बोहल्यावर चढलीस
तेव्हा मात्र नयनी दोघांच्या अश्रू तरळले भाव नजरेतील सावरताना लोकांनीही
पहिले ... मैत्री कि प्रेम म्हणावे कधीच नाही कोणा कळले नाते तुझे-माझे .. असे कसे हे जगावेगळे ...
No comments:
Post a Comment