Friday 14 September 2012

माझं प्रेम

"मी ही कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावर ही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी ही हरवून जायाचो,
कधी कधी तर वेळेचाही भान विसरून जायचो..
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूचं का होईना पण I Love You म्हणायचो..
नाहीचं Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ..
पण मी मात्र sMs-sMs खेळत राहायचो,
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं..
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
जाता जाता मला खूप वेदना दिल्या..
पण ?????
माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं..
जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत
धरतो तिचं अस्तित्वचं आपण Assume करतो..
समजत नाही कधी मोल नात्यांचं,
आणि मग दुःख करतो ते दुरावल्याचं..
आज खरचं समाधान वाटतंय,
की मी ही कधी प्रेम केलं होतं..
खरंच माझं प्रेम व्यर्थ नव्हतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ
घेऊन गेलं...."

No comments:

Post a Comment