Thursday 11 October 2012

सतत विचार

आपण सतत विचार करत असतो...
मनात आपण काय विचार करतो ?
आपण का विचार करतो ?
काय चाललय मनात ?
तुम्ही कधी एकलंय का ?
ऐकायला वेळ आहे का ?
अस होतं का ?
आणि होत असेल तर का होत ?
मन तर कशाने ना काशाने एकदम ठसाठस भरलेले.त्यात अनेक
गोष्टी ठासून ठुसून भरलेल्या असतात. त्यात ना काही जागा उरते ना
वेगळा विचार करायला वेळ मिळत. नेहमीचं कुठेतरी गुतंलेले असते
एक ना हजारो गोष्टी ....
सांध सोप सरळ जीवन कठीन करुन टाकायचं.......
चिंता करायची , तणावात रहायचं आणि ते कमी करायला
काहीतरी विरंगुळा म्हणून काही तरी शोधत फिरायचं
पण एक सांगा इतकं टेन्शन येतं कुठून ???
त्यामुळे मनावर आणखी वेगळे ओझे.......
अस टेन्शन घेवून जगायला खरचं आवडत का ?
फक्त टेन्शन घेवून जगायचं तर मग
जीवनात आनंदाला काहीचं महत्व नाही का ?
जर आहे तर मग आपल्याला आनंदी नाही होता येत का ?
आणि झालाचं तर मग तो आनंद काही काळचं का टिकतो ?
अस नाही होवू शकत का की आपण आपलं मन थोडं
रिकामं ठेवायचं .... आपले स्वप्न... आपल्या ईच्छा.....आपले ध्येय...
त्याच्यासाठीचे विचार आपल्याला आनंद देण्यार्‍या आठवणी ....
मनातला एक कप्पा ....मनातली ती जागा फक्त स्वतःसाठी रिझर्व....
करुन पहायला काय हरकत आहे ?

No comments:

Post a Comment