Thursday, 11 October 2012

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे

जाणिले ना कोणी माझ्या मनाचे 
काय असे त्यात जे लपले आहे

जो येतो तो अपुलेच गातो
नसे ठाव त्यासी माझ्या मनाचा

कोण आपुले कोण परके
कसे ओळखु सगळेच सारखे

टोचती एक खंत मना सदा
न जाणिले कोणी ते जाणिले माझ्या अश्रुंनी

ओघळले गालावरी सात्वंन कराया माझे
सांगुनी गेले अलगद मना
कोणी नाहि सोबत तरी आम्ही आहोत आजन्म तुझे.

जेव्हा वाटे एकटे कधी...बोलव तु निर्धास्त आम्हाला
नाही कधी म्हणणार नाही..येउ तुझ्या भेटिला..

No comments:

Post a Comment